बुधवार, ३ जून, २०१५

शेतक-यांना प्राधान्याने खरीप पीक कर्ज उपलब्ध करुन द्या :- जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे दि.11 :- खरीप हंगाम 2015-2016 साठी शेतक-यांना पीक कर्ज प्राधान्याने उपलब्ध करुन द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
     खरीप पीक कर्ज 2015-16 चा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हयातील बॅकर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक मॅनेजर एस.एस.ईखारे,नाबार्डचे अरविंद बोरसे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ज्ञानेश्वर बुथ,कृषी उपसंचालक प्रमोद वानखेडकर, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, एचडीएफसी बँकेचे राजकुमार शाह, स्टेट बँक ऑफ हेद्राबादचे संदीप महापात्रा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे संजय गुरव,पंजाब नॅशनल बँकेचे ए.एन.ब्राम्हणकर,आयसीआयसीआय बँकेचे एस.आर.देवाणकर, सिंडीकेट बँकेचे वाय.एस.भट, बँक ऑफ इंडियाचे गणेश पाटील,अलाहाबाद बँकेचे भैरव प्रसाद, आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की,धुळे जिल्हयातील जास्तीत जास्त कुटूंबे ही शेतीवर अवलंबून आहेत.हे शेतकरी आधुनिक पध्दतीने शेती करुन त्याच बरोबर नगदी पीके घेवून आपला आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे शेतक-यांना खरीप हंगामासाठी बँकानी सहज पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे असेही,यावेळी जिल्हाधिका-यानी सांगितले.
     पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की,मागील काही वर्षापासून जिल्हयात अतिवृष्टी,गारपीटीमुळे शेतक-यांचे हाताशी आलेल्या पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.त्यामुळे मागील हंगामात शेतक-यांनी घेतलेले पीक कर्ज अनेक शेतकरी फेडू शकलेले नाहीत.बँकांनी अशा शेतक-यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करुन त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे,असे सांगुन जिल्हाधिकारी म्हणाले की,कुठल्याही परीस्थितीत जिल्हयातील एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये याची दक्षता बँकांनी घ्यावी असेही जिल्हाधिकारी मिसाळ यांनी सांगितले.
जिल्हयात दुग्धव्यवसायाला चालना देण्याची गरज

     धुळे जिल्हा हा पारंपरिक पध्दतीने दुग्धव्यवसाय करणारा जिल्हा आहे.जिल्हयात मोठया प्रमाणावर दुभत्या जनावराचे प्रमाण आहे.दुग्ध व्यवसाय हा संघटीतपणे करुन जिल्हातील दुधाचे उत्पादन वाढविण्याची व दुधाचा दर्जा वाढविण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारीनी याच बैठकीत सांगितले.
     जिल्हयातील शेतक-यांनी व दुध उत्पादकांनी संकरीत जनावराच्या माध्यामातून दुध उत्पादन वाढून आपला व आपल्या कुटूंबाचा आर्थिक विकास करावा.असेही जिल्हाधिकारानी या बैठकीत सांगितले. 

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा