धुळे, दि. 2 :-शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात, योग्य दरात आणि योग्य वेळी बी-बियाणे, खते
उपलब्ध करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ
यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खताची आढावा बैठक आयोजित
करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा
परिषदेचे कृषि विकास अधिकारी बी. व्ही. बैसाणे, धुळे रेल्वे स्टेशनचे स्टेशन मॅनेजर एस. जे.
महाजन, पंचायत समिती कृषि अधिकारी आर. एस. चौधरी (धुळे), ए. एन. कौर (शिरपूर), जिल्हा
मार्केटिंग अधिकारी बी. आर. प्रबोधनकार, आर.सी.एफ. चे विजय बाविस्कर, विशाल नवले,
पुरवठादार, कंपनी प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना सहकारी सोसायटया मार्फत बांधावर खते उपलब्ध करण्यासाठी कृषि
विभागाची महत्वाची भूमिका असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की,
दरमहा सप्टेंबर पर्यंत खतांचा व्यवस्थित पुरवठा नियोजन बध्द पध्दतीने करण्यात यावा. खतांचा
काळाबाजार व गैरप्रकार करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, खेडयापाडयातून खत
पुरवठा करण्याची व्यवस्था उत्पादक कंपन्यांनी करावी, जेणे करून शेतकऱ्यांना सहज व
जवळच्या ठिकाणी खते उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, धुळे हा कृषि प्रधान जिल्हा
आहे. बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे सहज
उपलब्ध झाली पाहिजेत. खत पुरवठादार व उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रत्येक भागात
व्यवस्थीत खत पुरवठा करावा. सोसायटयामार्फत व शेतकरी संघा मार्फत खत पुरवठा केल्यास
त्यात पारदर्शकता राहू शकते. शेतकऱ्याला जे खत पाहिजे तेच खत दिले पाहिजे, असेही त्यांनी
यावेळी सांगितले.
धुळे जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा आहेत. या सीमेवरून बनावट खते येण्याची
शक्यता आहे. या बनावट खतांमुळे शेतकऱ्यांची मोठया प्रमाणावर फसवणूक करण्यात येते
त्यामुळे यंत्रणांनी दक्ष राहून बनावट खत जिल्ह्यात येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.
बनावट खत विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी
सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा