नाशिक दि. 09 : चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित महाआरोग्य शिबीरात 1207 रुग्णांची
तपासणी करुन औषधोपचार करण्यांत आले अशी माहिती
चांदवड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी दिली.
यावेळी
ट्रामा केअर युनिट, अधिकारी व कर्मचारी निवासस्थानाचे उदघाटन पालकमंत्री गिरीष महाजन , सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या
हस्ते नुकतेच करण्यांत आले. यानंतर महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यांत आले होते. या शिबीरात नेत्ररोगाचे 594, अस्थिरोग 245, मेडिसीन
192, कान-नाक-घसा 32, स्त्रीरोग 84 इतर 60 असे एकूण 1207 रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार
करण्यांत आले.
रुग्णांच्या
तपासण्या जे. जे. हॉस्पीटलचे डीन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (नेत्रतज्ज्ञ), नेत्रचिकित्सक
डॉ. रागिणी पारीख, बी.जे. मेडीकल कॉलेजचे डीन डॉ. अजय चंदनवाले, डॉ. दिलीप कदम, बालरोगतज्ज्ञ
डॉ. नितू कुटे, ट्रामा हॉस्पीटलच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. राजश्री कटके, एम.एस. वैद्य
हॉस्पीटलचे डॉ. विक्रम वैद्य यांनी केल्या.
या
शिबिराचे आयोजन आरोग्य उपसंचालक डॉ. बी. डी. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ई. डी.
माले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यांत आले
होते.
0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा