धुळे, दि. 8 :- धुळे बंधाऱ्याच्या कालव्यावरील महिंदळे
शिवारातील हनुमान टेकडी ते गांधी पुतळयाजवळील अतिक्रमण दि. 9 जुलै ते 11 जुलै,
2015 या कालावधीत काढण्याचे निश्चित केलेले आहे.
या अतिक्रमणाला विरोध होऊन कायदा व
सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट
शक्यता आहे. अतिक्रमण काढण्याच्या वेळेतस
परिसरात कुणीही गर्दी, गोंधळ निर्माण करू नये या उद्देशाने व अतिक्रमण सुरळीत पार
पाडण्याच्या दृष्टीने धुळे भागाचे
उपविभागीय दंडाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी हनुमान टेकडी ते गांधी पुतळयाजवळील
परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे
कलम 144 (3) चे मनाई आदेश दि. 9 जुलै ते 11 जुलै, 2015 पावेतो सकाळी 7-30 ते
सायंकाळी 6-30 वाजेपावेतो लागू केले आहेत.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा