मुंबई, दि. 4 : ‘आदिवासी सेवक व आदिवासी सेवा संस्था’ हा पुरस्कार देण्याकरिता राज्यस्तरीय निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. अदिवासी विकास मंत्री या समितीचे अध्यक्ष आहेत.
आदिवासी विकास राज्यमंत्री हे या समितीचे उपाध्यक्ष आहेत. तर विधानसभा सदस्य प्रा. अशोक रामाजी उईके, विधानसभा सदस्य संजय हनवंतराव पुराम व सचिव, आदिवासी विकास हे सदस्य असून आयुक्त आदिवासी विकास , नाशिक हे सदस्य सचिव असतील.
हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा