धुळे, दि. 25 :- गेल्या शुक्रवारी गोंदूर-नकाणे रोड वरील 30 एकर परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या नूतन
इमारतीत यापूर्वी मेहेरगाव येथे असलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाचे स्थलांतर करण्यात आलेले आहे. नूतन इमारतीत उपलब्ध सोयी-सुविधा आणि त्रुटींची
पूर्तता कशी करता येईल हे जाणून घेण्याकरिता जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी
आज प्रत्यक्ष जाऊन नूतन इमारतीची व परिसराची पाहणी केली. त्यांचे समवेत उपविभागीय अधिकारी विठ्ठल
सोनवणे, तहसिलदार दत्ता शेजूळ, शासकीय तंत्र निकेतन स्थापत्य अभियांत्रिकी
विभागाचे विभाग प्रमुख प्रा. के. आर. पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता
व्ही. के. सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता एस.
एस. सानप, सार्वजनिक बांधकाम विभाग विद्युत विभागाचे शाखा अभियंता एन. डी. इंगळे,
महानगरपालिका शाखा अभियंता बी. डी. जगदाळे, पी. डी. चौधरी, जिल्हा परिषद बांधकाम
विभागाचे उप अभियंता ए. बी. मोरे, शाखा अभियंता एन. डी. चौधरी, जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. पी.
बोरसे आणि शाखा अभियंता पंकज शर्मा आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी 30 एकर परिसरात
नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात प्रामुख्याने
ग्रंथालय, वर्ग खोल्या, प्रयोगशाळा, मुलांचे आणि मुलींचे वसतिगृह, भोजन कक्ष,
स्वयंपाक गृह, अधिकारी, कर्मचारी यांची निवासस्थाने त्याचबरोबर पाणी पुरवठा करता
बांधण्यात आलेले जलकुंभ, परिसरातील पथदिवे आदी बाबींची बारकाईने पाहणी केली. या
पाहणी दरम्यान त्यांना आढळून आलेल्या त्रुटींबाबत विद्यालयाच्या विभागीय
कार्यालय पुणे येथील अभियंता पंकज शर्मा यांना
नोंदी घेऊन त्याबाबतचा अहवाल जिल्हा समितीपुढे सादर करण्याबाबत सूचना
दिल्या. त्याचप्रमाणे विद्यालयातील इयत्ता सहावी ते दहावी या वर्गात शिक्षण घेत
असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थीनींची निवासव्यवस्था आणि त्यांना आवश्यक असलेल्या
सोयी सुविधा योग्य पध्दतीने पुरविण्याबाबत आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत विशेष
काळजी घेण्याच्या सूचना प्राचार्य आणि शिक्षक वृंदांना दिल्या.
प्रारंभी प्राचार्य एस. पी. बोरसे यांनी मान्यवरांचे स्वागत
करून जवाहर नवोदय विद्यालयाच्या नव्या परिसरात असलेल्या त्रुटींची माहिती सादर
केली.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा