धुळे, दि. 18 :- जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या दरम्यान
21 सप्टेंबर, 2015 (पाचवा दिवस व गौरी विसर्जन दिवस), 23 सप्टेंबर, 2015 (सातवा दिवस), 25 सप्टेंबर, 2015 (नववा दिवस), 27 सप्टेंबर, 2015 (अनंत चतुर्दशी) असे एकूण चार
दिवस सकाळी 6-00 वाजेपासून रात्री 12-00 वाजेपावेतो ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी
पर्यावरण विभागाच्या 31 जुलै, 2013 रोजीच्या शासन निर्णयानुसार
जिल्हादंडाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी ध्वनी प्रदुषण नियंत्रण प्राधिकरण
यांच्या सहमतीने श्रोतेगृहे,सभागृहे,सामुहीक सभागृहे, मेजवाणी कक्ष यासारख्या बंद
जागा खेरीज विहीत अटी व शर्तीवर तसेच कायदा व सुव्यवस्था लक्षात घेऊन धुळे जिल्ह्यासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा
वापर करण्यास परवानगी दिली आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा