मुंबई, दि. 18 : राज्यात उद्योग
सुरू करण्यासाठी विविध विभागाच्या लागणाऱ्या परवानग्या ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ अंतर्गत
सात दिवसांच्या आत देण्यात याव्यात. या परवानग्या देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे
निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
उद्योगांसाठी लागणाऱ्या
विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात याव्यात. काही विभागांच्या मान्यता
मिळण्याची प्रक्रिया सात दिवसात पूर्ण न झाल्यास त्या प्राप्त झाल्या आहेत असे समजण्यात
यावे. यासाठीची यंत्रणा उभारण्यात यावी. असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
आज मंत्रालयात आयोजित
केलेल्या विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री प्रकाश
महेता,
कामगार राज्यमंत्री
विजय देशमुख, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव
नितीन करीर,कामगार विभागाचे प्रधान
सचिव बलदेव सिंह, महसूल
विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव,महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबई पोलीस आयुक्त अहमद
जावेद,
पर्यटन विभागाच्या
सचिव वल्सा नायर सिंह, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन तसेच विविध विभागाचे
अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जास्तीत जास्त उद्योगांना राज्यात आकर्षित करण्यासाठी
विविध स्तरावर पोषक वातावरण कसे तयार करता येईल, याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
कारखाने व संस्था यांचे परवाने देण्यासाठीची ऑनलाईन कार्यप्रणाली विभागाने 2
ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी,तसेच पर्यटन क्षेत्रातील हॉटेल व्यवसाय, आदरातिथ्य सेवा, पुरविणाऱ्या व्यावसायिकांनी
पर्यटकांच्या सोई-सुविधांसह त्यांच्या सुरक्षेसंबंधीची ही जबाबदारी सांभाळणे आवश्यक
आहे.
०००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा