मुंबई, दि. 18 : राज्य सरकारी चतुर्थश्रेणी
कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या
विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केले.
मंत्रालयात
आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य
सचिव एस. के. श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, महसूल
विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव प्रमोद नलावडे,
राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, महाराष्ट्र
जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश कदम तसेच संघटनेचे इतर
पदाधिकारी उपस्थित होते.
या
बैठकीत अनुकंपा तत्त्वावरील सेवा भरती, सेवानिवृत्त तसेच वैद्यकीय कारणास्तव अपात्र
ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यास सेवेत सामावून घेणे आदीमागण्यांबाबत सविस्तर चर्चा
करण्यात आली.
००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा