परभणी, दि 03 : - मराठवाड्यात मागील काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी झाले असून यंदाही समाधानकारक पाऊस झालेला
नाही. या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पिण्याचे पाणी,जनावरांसाठीचारा आणि मजूरांच्या
हातालाकाम उपलब्ध करुन देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून यासाठी विविध
उपाययोजनाही करण्यात येत आहेत. टंचाईस्थितीतशासन आणि प्रशासन
शेतक-यांच्यापाठीशी खंबीरपणे उभे असून यापरिस्थितीमध्ये शेतक-यांनी खचून न जाता
मनोबल भक्कम ठेऊन या परिस्थितीचा धीरानेमुकाबला करावा असे आवाहनमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीसयांनी मानवत तालुक्यातील ताडबोरगाव व पाथरी तालुक्यातील ढालेगाव
येथे केले.
यावेळी परिवहन तथा
पालकमंत्री दिवाकर रावते, पाणीपुरवठा व
स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकासमंत्री पंकजामुंडे, खासदार संजय जाधव, आमदार डाॅ राहुल पाटील, आमदार मोहन
फड, आमदार बाबाजानी दुर्राणी, मुख्यमंत्र्यांचेप्रधान सचिव प्रविणसिंह
परदेशी, विभागीय
आयुक्तउमाकांत दांगट, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बी
टी कदम, माजी आमदार मीराताई रेंगे, तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीसम्हणाले, मराठवाडयातील टंचाई स्थितीची
प्रत्यक्षशिवारात पाहणी करुन
शेतक-यांच्या, ग्रामस्थांच्यासमस्या जाणून घेण्यासाठीशासन आणि प्रशासन आपल्या
दारीआले आहे. यंदाज्यांनी
पेरणी केली त्यांचीपिके पावसाअभावी वाया गेली आणि ज्यांनी पावसाच्याप्रतिक्षेत
तयारी केली पण पेरणी करु शकले नाहीत अशा
शेतक-यांचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीपहंगाम जरी
वाया गेला तरी रब्बीहंगामासाठी शासनाने बियाणेआणि खते यांच्या उपलब्धतेसाठीकाटेकोर
नियोजन केले असून शेतक-यांना या
संकटातून सावरण्यासाठीवीज बिलात सुट देण्याचेही विचाराधीन असल्याचे श्री फडणवीस
यांनी सांगितले.
पिण्याचेपाणी, जनावरांनाचारा
आणि मजूरांच्या हातालाकाम देण्यासाठी आता सर्वतोपरीप्रयत्न करण्यात येत आहेत.
शेतक-यांचे जनावरांवर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असते, जनावरांना जगविण्यासाठी
आॅगस्ट महिन्यातच चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतक-यांना
दिलासा मिळत आहे. अल्पकाळात तयार होणारा हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक
तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. दहा टक्के रक्कम जनावरांच्या पाण्यासाठीराखीव
ठेवण्यात आली आहे. तसेचचारा उपलब्ध नसल्यास परराज्यातूनहीचारा उपलब्ध करुन
देण्यातयेईल.
टंचाईस्थितीमध्ये मजूरांनाअत्यंत माफक
दरामध्ये 15 ऑगस्टपासूनधान्य पुरवठा करण्यात
येतअसून या योजनेचा लाभ 60 लाख गरजू
कुटुंबाना होणार असून अशाप्रकारची योजना राबविणारेमहाराष्ट्र हे देशातील
पहिलेराज्य असल्याचेहीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी यावेळी सांगितले.
ढालेगाव, ताडबोरगाव व पानेरा येथे
मुख्यमंत्री फडणवीस यांनी साधला शेतक-यांशी संवाद
|
यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
एस के दिवेकर, उपविभागीय कृषी अधिकारी आर टी सुखदेव, तहसिल, कृषी व संबंधीत विभागांचे
तालुकास्तरीय अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा