मुंबई दि. 3 :माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकारी व
कर्मचाऱ्यांसाठी आज मंत्रालयातील मिनी थिएटर येथे सोशल मीडिया कार्यशाळेचे आयोजन
करण्यात आले. दैनिक लोकसत्ताचे सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह प्रशांत ननावरे यांनी
सोशल मीडियाशी संबंधित विविध विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला.
यावेळी माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक, संचालक(प्रशासन) देवेंद्र भुजबळ, संचालक
(वृत्त व जनसंपर्क) शिवाजी मानकर, उपसंचालक (प्रशासन) गणेश मुळे, उपसंचालक (वृत्त)
ज्ञानेश्वर इगवे, वरिष्ठ सहायक संचालक (वृत्त) संभाजी खराट आदी उपस्थित होते.
शासनाचे विविध कल्याणकारी निर्णय तसेच
योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी फेसबुक,
ट्विटर यांसारखी माध्यमे अतिशय उपयुक्त आहेत. त्यांचा प्रभावी वापर कसा करावा,
कोणती काळजी घ्यावी याबाबत श्री. ननावरे यांनी मार्गदर्शन केले.
प्रारंभी महासंचालक श्री. ओक यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. ननावरे यांचे स्वागत
केले. सूत्रसंचालनसहायक संचालक ब्रिजकिशोर झंवर यांनी केले. कार्यशाळेसाठी
महासंचालनालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा