धुळे, दि. 26 :- दक्षता जनजागृती सप्ताह 26 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीच्या निमित्ताने
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी भ्रष्टाचार
निर्मूलनाची कर्मचारी, अधिकाऱ्यांना आज
शपथ दिली.
यावेळी आमदार
जयकुमार रावल, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख,
जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, जिल्हा नियोजन समिती लघुगट
सदस्य श्रीमती सुशिलाबाई ईशी, निकम कामराज उर्फ दिगंबर जगदीश, सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी राज्यपाल
सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षता जनजागृती सप्ताह निमित्ताने
पाठविलेल्या संदेशाचे वाचन केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा