मुंबई, दि. 17 : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उपलब्ध करुन
देण्यात आलेल्या 1800 - 22 - 0110 या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर मुंबई विभागातून
एप्रिल ते नोव्हेंबर 2011 या कालावधीत एकूण 3816 तक्रारी प्राप्त झाल्या असून
त्यापैकी 2135 तक्रारींबाबत कारवाई करण्यात आली आहे.
वरील टोल फ्री क्रमांकावर 24 तास सार्वजनिक
सेवा वाहन चालकांविरुद्ध जनतेस तक्रार नोंदविता येते. संबंधित प्रादेशिक परिवहन
कार्यालयाद्वारे तक्रारीतील नमूद वाहन चालकांविरुद्ध व परवाना धारकांविरुद्ध 15
दिवसांच्या आत कार्यवाही करण्यात येते. केलेल्या कार्यवाहीबद्दल तक्रारकर्त्यास
मोबाईलवर एस.एम.एस.द्वारे कळविण्यात येते.
मुंबई शहर व उपनगरे येथील सार्वजनिक सेवा
प्रवाशी वाहतुकीचा वापर करणाऱ्या प्रवाशांनी 1800 - 22 - 0110 या टोल फ्री
दूरध्वनी क्रमांकाचा रिक्षा, टॅक्सी, बस इत्यादींबाबत तक्रार करण्यासाठी वापर
करावा, असे आवाहन परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा