लोकराज्यचे विशेषांक हे आता लोकराज्यचे एक वैशिष्ट्य बनले आहे. याला वाचकांचा
प्रचंड प्रतिसादही लाभत आहे. याच परंपरेचा एक भाग म्हणून डिसेंबर महिन्याचा विदर्भ
विशेष अंक म्हणून प्रसिद्ध झाला आहे.
या विशेष अंकात अनेक मान्यवरांनी विविध
विषयांवरील लेखाच्या माध्यमातून आपले योगदान दिले आहे. न्या.धर्माधिकारी यांचा
सांस्कृतिक संक्रमण, डॉ.द.भि.कुलकर्णी यांचा पूर्व-पश्चिम संवाद, सुरेश द्वादशीवार
यांचा वंचना, उपेक्षा आणि अपेक्षा, निशिकान्त मायी यांचा स्वातंत्र्य चळवळीतील
योगदार, डॉ.श्रीपाद जोशी यांचा सांस्कृतिक अनुशेषाची संकल्पना, डॉ.अशोक चोपडे यांचा
पुरोगामी चळवळीतील आघाडी, डॉ.श्रीकांत तिडके यांचा प्रबोधनाचे दीपस्तंभ, प्रा.भाऊ
लोखंडे यांचा दलित नेतृत्वाचा उदय आणि विकास, डॉ.प्रदीप गायकवाड यांचा डॉ.आंबेडकर :
एक नवा अन्वयार्थ, नरेश मेश्राम यांचा विश्वशांतीची गंगोत्री, प्राचार्य मदन धनकर
यांचा विदर्भातील ज्ञानपीठे या लेखांचा यात समावेश आहे.
या व्यतिरिक्त
डॉ.रमेश जनबंधु, डॉ.मधुकर वाकोडे, प्रा.विठ्ठल वाघ, डॉ.सुनंदा देशपांडे, राम जाधव,
डॉ.हरिश्चंद्र बोरकर, डॉ.प्रमोद मुनघाटे, डॉ.श्रीकृष्ण राऊत, डॉ.सदानंद देशमुख,
अनिल महात्मे, वासंती मार्कन्डेयवार, डॉ.रमाकांत पितळे, ॲड.मधुकर किंमतकर, मोहन
अटाळकर, मारूती चितमपल्ली, डॉ.विनायक तुमराम, प्रवीण बर्दापूरकर, डॉ.प्रदीप
मेश्राम, अनिल ठाकरे, डॉ.सतीश वटे, प्रकाश कुंभारे, डॉ.चंद्रशेखर गुप्त, हेमंत
देसाई अशा मान्यवरांच्या लेखांचाही या अंकात समावेश आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा