धुळे दि. 26 जाने.12 :-
असंरक्षित व माथाडी कामगार मंडळाचे व घरेलू कामगारांचे प्रश्न सोडविणयासाठी आपण
प्रयत्नशिल असून त्यासाठी नाशिक येथे विभागीय स्तरावर धुळे, नंदुरबार व जळगांव
जिल्हयाच्या बैठकीचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी
विकास, कामगार, लाभक्षेत्र व फलोत्पादन राज्यमंत्री ना. राजेंद्र गावीत यांनी आज
दोंडाईचा विश्रामगृहात आयोजित माथाडी कामगार मंडळाच्या बैठकीत बोलतांना केले.
दोंडाईचा येथे आज राज्याचे आदिवासी विकास व कामगार राज्यमंत्री
ना. राजेंद्र गावीत यांच्या अध्यक्षतेखाली असंरक्षित व माथाडी कामगार व घरेलू
कामगार महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, माजी आ.राकृष्ण पाटील, माथाडी कामगार
मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ना. गावीत यांनी माथाडी कामगार व कृषी उत्पन्न बाजार
समितीतील अडते यांच्याशी चर्चा करुन म्हणणे ऐकुण घेतले. तसेच कृषी उत्पन्न बाजारी
समितीत शेतकऱ्यांच्या मालाला तीन वेळा लेव्ही लागते ती कमी करुन एक किंवा दोन वेळा
करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.यावर निश्चित मार्ग काढू असेही त्यांनी यावेळी
सांतिगतले. तसेच कामगार मंडळाचे प्रश्न लवकरच मार्गी लावू असेही त्यांनी यावेळी
सांगितले.
ते पुढे म्हणाले की, कामगारांच्या मागण्यांबाबत निश्चित विचार
करुन त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करु असे सांगितले.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा