मुंबई, दि.
26 : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील विधानभवन येथे महाराष्ट्र
विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते आणि विधानसभेचे अध्यक्ष दिलीप
वळसे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. विधानभवनाच्या प्रांगणात
आज सकाळी आयोजित ध्वजारोहण सोहळा कार्यक्रमास विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे,
विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदींसह विधीमंडळाचे सदस्य, विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, सहसचिव भाऊसाहेब
कांबळे, यु. के. चव्हाण आदींसह विधानमंडळाचे अधिकारी-कर्मचारी
उपस्थित होते.
मुख्य सुरक्षा अधिकारी शिवाजी बोडखे यांच्या नेतृत्वाखालील
पथकाने यावेळी मानवंदना दिली.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा