मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र शासनाने 10 वर्ष मुदतीचे दोन हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे एका अधिसूचनेद्वारे विक्रीला काढले असून भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये मंगळवार, दिनांक 21 फेब्रुवारी, 2012 रोजी विक्रीसाठी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत उपलब्ध होतील. रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट, मुंबई कार्यालयात या रोख्यांचा लिलाव करण्यात येणार असून या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या भांडवली खर्चासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी करण्यात येईल.
शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र, वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीत जास्त 1 टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट शाखेमध्ये दिनांक 21
फेब्रुवारी, 2012 रोजी लिलावाचे स्पर्धात्मक बिडस्
संगणकीय प्रणालीद्वारे निगोशिएटेड डिलींग सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते दुपारी
12.30 वाजेपर्यंत तर अस्पर्धात्मक बिडस् सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर
करावेत. लिलावाचा निकाल रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 22
फेब्रुवारी, 2012 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट यांच्या कार्यालयात रोखीने,
बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ
इंडिया, मुंबई खात्यात देय असलेले धनादेशाद्वारे बँकेची कामकाजाची वेळ
संपण्यापूर्वी करण्यात येईल.
कर्जरोख्याचा कालावधी हा 10 वर्षाचा असेल आणि तो दिनांक 22
फेब्रुवारी , 2012 पासून सुरु होईल तर दिनांक 22
फेब्रुवारी, 2022 रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परतफेड करण्यात येईल. या कर्जरोख्यास व्याजाचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कुपन दराएवढा असेल आणि हे व्याज प्रतिवर्षी दिनांक 22
ऑगस्ट आणि 22 फेब्रुवारी रोजी सहामाही पद्धतीने देण्यात येईल.
महाराष्ट्र शासनाने ही अधिसूचना राजपत्र असाधारण भाग-1 मध्ये,
उपविभाग, दिनांक 15 फेब्रुवारी , 2011 रोजी प्रसिद्ध केली
आहे.
-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा