मुंबई दि. 15
: ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान गुरुवार दि. 16 फेब्रुवारी 2012 रोजी होत आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी संबंधित महापालिका हद्दीत सदर दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
यासंबंधीची अधिसूचना सामान्य प्रशासन
विभागाने दि. 15 फेब्रुवारी 2012 रोजी निर्गमित केली आहे.
क्रमांक संकीर्ण
2012/ प्र.क.47/2012/29 परक्राम्य संलेख अधिनियम 1881 (1881
चा 26) च्या कलम 25 मध्ये दर्शविलेल्या व भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक 39/1/68 जेयूडीएल-तीन दि. 8 मे 1968 अन्वये महाराष्ट्र शासनास
सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाने ही सुट्टी जाहीर केली
आहे.
.
. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा