मुंबई, दि. 12 : क्रीडा व युवक सेवा
संचालनालयाच्या आस्थापनेवर मानधनतत्त्वावर भरण्यात येणाऱ्या 153 क्रीडा मार्गदर्शक
पदांच्या मुलाखतीचे दि. 21 ते 25 फेब्रुवारी 2012 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा
संकुल म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखतीचा दिनांक व
खेळनिहाय कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक 21 फेब्रुवारी आर्चरी, ॲथलेटिक्स,
बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सींग, क्रिकेट ; 22 फेब्रुवारी हॅण्डबॉल, हॉकी,
ज्युदो ; 23 फेब्रुवारी सायकलिंग, फेन्सिंग, फूटबॉल,
जिम्नॅस्टिक्स, शुटींग, स्विमिंग ;
24 फेब्रुवारी कबड्डी- खो खो, पॉवरलिफ्टिंग, सॉफ्टबॉल, टेबलटेनिस, वेटलिफ्टिंग; 25 फेब्रुवारी व्हॉलीबॉल, कुस्ती, रोलरस्केटिंग, स्केटिंग, वुशू, टेनिस यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
24 फेब्रुवारी कबड्डी- खो खो, पॉवरलिफ्टिंग, सॉफ्टबॉल, टेबलटेनिस, वेटलिफ्टिंग; 25 फेब्रुवारी व्हॉलीबॉल, कुस्ती, रोलरस्केटिंग, स्केटिंग, वुशू, टेनिस यासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.
मुलाखतीचे पत्र प्राप्त झालेल्या
उमेदवारांनी त्यांच्या खेळानुसार नमूद दिनांकास सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष उपस्थित
रहावे, असे संचालक, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले
आहे.
0
0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा