बुधवार, २९ फेब्रुवारी, २०१२

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार जाहीर


मुंबई , दि. 28 : महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन स्पर्धेचे सन 2011-12 यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.  नाशिक जिल्ह्यातील डॉ.बाबासाहेब  आंबेडकर पाणी वापर संस्थेस सात लाख रुपयांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या पाणी वापर संस्था
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी वापर संस्थेला (वाघाड प्रकल्प, नाशिक प्रदेश) सात लाख रुपयांचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार तर याच प्रकल्पावरील मोहाडी येथील नवनाथ पाणी वापर संस्थेला पाच लाख रुपयांचा द्वितीय राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तीन लाख रुपयांच्या तृतीय राज्यस्तरीय पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील कै. दादासाहेब पाटील पाणी वापर सहकारी संस्था मर्यादित (जायकवाडी प्रकल्प, औरंगाबाद प्रदेश) या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
प्रदेशस्तरीय विभागातील प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या तीन व दोन लाख रुपयांच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या पाणी वापर संस्था अनुक्रमे पुढीलप्रमाणे.
नाशिक - मनकर्णा पाणी वापर संस्था, पालखेड, ता. निफाड, जि. नाशिक, ओझरखेड प्रकल्प
                बाणेश्वर पाणी वापर संस्था, आंबेदिंडोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक, वाघाड प्रकल्प.
पुणे - तात्यासाहेब कोरे वारणा प्रकल्पीय पाणी वापर संस्था, मनपाडळे, ता.हातकणंगले,
                जि. कोल्हापूर, मनपाड लघु पाटबंधारे प्रकल्प.
               कानिफनाथ पाणी वापर संस्था, क्रमांक 55, चोंभूत, ता. पारनेर, जि. अहमदनगर,  कुकडी  प्रकल्प.
कोकण-   देवगांगेश्वर पाणी वापर संस्था, तिथवली, ता. वैभववाडी, जि. सिंधुदूर्ग, तिथवली लघु पाटबंधारे
                प्रकल्प.  रिध्दीनाथ पाणी वापर संस्था, वेल्होळी, ता. शहापूर, जि. ठाणे, वेल्होळी लघु पाटबंधारे 
                प्रकल्प.
अमरावती  - डॉ. शरद पाणी वापर संस्था, ता. वरुड, जि. अमरावती, नागठाणा लघु पाटबंधारे  प्रकल्प.  
                     गंगोत्री पाणी वापर संस्था, इसंब्री, ता. वरुड, जि. अमरावती, शेकदरी लघु   पाटबंधारे प्रकल्प.
औरंगाबाद-  अडभंगनाथ पाणी वापर सहकारी संस्था मर्यादित, भांबेरी , ता. अंबड, जि. जालना,  जायकवाडी
                     प्रकल्प. कृष्णा कालवा वाटप सहकारी संस्था मर्यादित, मालेगांव, ता. अर्धापूर, जि. नांदेड,  
                     पुर्णा  प्रकल्प (वसमत नगर).
नागपूर-       साईबाबा पाणी वापर संस्था, अंतरजी, ता. आरमोरी, जि. गडचिरोली, इटियाडोह प्रकल्प. राजीव
                  गांधी  पाणी वापर सहकारी संस्था मर्यादित, सिल्ली (अंबाडी) ता. जि.भंडारा, सिल्ली (अंबाडी)
                   लघु टबंधारे प्रकल्प.
            राज्याच्या जलनितीनुसार सिंचन व्यवस्थापनात लाभधारक शेतकऱ्यांचा सहभाग असावा, सिंचन प्रणालीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन व्हावे म्हणून यात कायद्याचे पाठबळ देण्यासाठी  महाराष्ट्र सिंचन पध्दतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन, कायदा 2005 करण्यात आला. सहभागी पाणी वापर संस्थांचे सिंचन यशस्वी व्हावे, व्यवस्थापन कार्यक्षम असावे व संस्था स्वबळावर सुदृढ व्हाव्यात यासाठी पाणी वापर संस्थांच्या व्यवस्थापनाकरिता महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्याअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात येतात. या पुरस्कारांचे हे तिसरे वर्ष आहे.
हा शासन निर्णय 24 फेब्रुवारी 2012 रोजी प्रसिध्द करण्यात आला असून महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. त्याचा संगणक सांकेतांक 20120224085649249001 असा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा