मुंबई, दि. 17 : सांस्कृतिक कार्य
संचालनालयातर्फे आयोजित 4थ्या सप्तरंग
महोत्सवाचे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी यांच्या हस्ते
सात रंगाचे फूगे हवेत सोडून आज गेट वे ऑफ इंडिया येथे झाले.
यावेळी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक प्रमोद नलावडे, सांस्कृतिक कार्य
विभागाच्या उपसचिव स्वाती म्हसे-पाटील, सांस्कृतिक कार्य संचालक आशुतोष घोरपडे आदी
मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या
उद्घाटन सोहळ्यानंतर स्वरजल्लोष हा दर्जेदार
मराठी गीतांचा विविधरंगी कार्यक्रम सादर
करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदन पुष्कर श्रोत्री व मृण्मयी देशपांडे यांनी
केले. सांस्कृतिक कार्य सहसंचालक मिनल जोगळेकर यांनी आभार मानले. हा महोत्सव
दिनांक 19 फेब्रुवारी पर्यंत गेट वे ऑफ इंडिया येथे होणार आहे. तर, दि. 21 ते 23
फेब्रुवारी या कालावधीत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्य मंदिर, ठाणे येथे हा महोत्सव
आयोजित करण्यात आला आहे.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा