मुंबई, दि, 1 : तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल लहानवयातच जनजागृती व्हावी याकरीता इयत्ता पाचवी ते सातवीच्या अभ्यासक्रमात तंबाखूच्या दुष्परिणामांचा समावेश करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
तंबाखूविरोधी कार्यप्रणालीबाबत आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, राज्यमंत्री सतेज पाटील, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव व्ही.एल. अचलिया, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव इक्बालसिंग चहल, आरोग्य सचिव भूषण गगराणी, सलाम बॉम्बे फाऊंडेशनचे डॉ.पंकज चतुर्वेदी, महाराष्ट्र युनायटेड अगेन्स्ट किलर टोबॅको कॅम्पेनचे डॉ.आर बडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, तंबाखूच्या सेवनामुळे
कर्करोग्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तरूणांमधील वाढत्या व्यसनाधिनतेमुळे अनेक
सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. हे टाळण्याकरीता तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल
विद्यार्थ्यांना अवगत करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्यात
येणार आहे.
ते पुढे म्हणाले
की, जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत मुख्य सचिवांना सादर होणाऱ्या
मासिक अहवालात शैक्षणिक संस्थांच्या आवारात गुटखा विक्री
करणाऱ्यांवर केलेल्या कारवाईचा उल्लेख करण्याबाबत निर्देश देण्यात येतील.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा