मुंबई, दि. 30 : मराठी बोलपटाला 80 वर्ष
पूर्ण झाल्यानिमित्त निर्माता-दिग्दर्शक महेश
टिळेकर यांनी काल रवींद्र नाट्य मंदीर, प्रभादेवी येथे मराठी अभिनेत्रीच्या
नृत्यांचा सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम `मराठी तारका` सादर केला.
यावेळी सांस्कृतिक
कार्यमंत्री संजय देवतळे,
जलसंपदामंत्री सुनील तटकरे, हिंदी अभिनेत्री हेलन, झीनत
अमान, रती अग्निहोत्री, वर्षा उसगावकर, अभिनेता संजय नार्वेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या सौदर्याने
रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या प्रख्यात मराठी अभिनेत्रींनी लावणी,
लोककला, नृत्य कला प्रकार या कार्यक्रमात सादर
केले. सुधा चंद्रन, रेशम टिपणीस, शर्वरी जमेनीस, क्रांती रेडकर, आदिती
भागवत, नूतन जयंत,
मेधा घाडगे, भार्गवी चिरमुले, किशोरी गोडबोले, स्मिता
शेवाळे, मानसी नाईक, पूजा सावंत, प्रिया बापट, तेजस्विनी पंडित, स्मिता तांबे,
तेजा देवकर, अमृता खानविलकर या अभिनेत्रींनी यात भाग घेतला होता.
तसेच विनोदी कलाकार विजू खोटे, किशोरी अंबिये, दिगंबर
नाईक, संदिप पाठक, दिपक देशपांडे यांनी देखील विनोदी
कार्यक्रम सादर केले.
या
कार्यक्रमाचे आयोजन निर्माता-
दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी केले होते. तर नृत्यदिग्दर्शन दीपाली
विचारे यांनी केले होते.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा