मुंबई, दि. 30 : आधुनिक महाराष्ट्राचे
शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि महाराष्ट्र
विधानमंडळाचे अमृत महोत्सवी वर्ष यानिमित्त `यशवंतराव महाराष्ट्रातले, यशवंतराव दिल्लीतले` या विषयावर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे मंगळवार, 3 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता
मध्यवर्ती सभागृह, विधानभवन येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
मधुकर भावे लिखित `महाराष्ट्र : काल, आज आणि
उद्या` या पुस्तकाचे प्रकाशन विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव
देशमुख आणि विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. विधानपरिषदेचे उपसभापती वसंत
डावखरे, विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, विरोधी पक्षनेते विनोद तावडे,
एकनाथ खडसे, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील आदी मान्यवर या कार्यक्रमास
उपस्थित राहणार आहेत.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा