धुळे, दि. 4 :-लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ दि. 3 ते 9 जून या
कालावधीत पर्यावरण सप्ताहास प्रारंभ झाला. पर्यावरण सप्ताहानिमित्त साक्री तालुक्यातील धमनार येथील
जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत
साक्री तालुक्यातील धमनार येथील लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांच्या कामांची
पाहणी श्री. विठ्ठल सोनवणे यांनी केली. त्यांचे समवेत जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर
इगवे, सरपंच भिलाजी सोनवणे, माजी सरपंच वसंतराव खैरनार, ग्रामस्थ आदी उपस्थित
होते.
त्यानिमित्त महात्मा गांधी
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड
झालेल्या गावांसह, प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, समाजमंदिर,
गावठाण, गायरान जमिनी, शासकीय, निमशासकीय कार्यालये, रस्त्याच्या दुतर्फा
वृक्षलागवड करण्यात येत आहे. या शासनाच्या विविध उपक्रमात ग्रामस्थांनी
सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. विठ्ठल सोनवणे यांनी यावेळी केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा