मुंबई, दि. 7 : नैसर्गिक आपत्ती तसेच विविध सण-उत्सव इत्यादीसाठी वर्गणी गोळा करण्यासाठी खासगी संस्था, व्यक्ती, अशासकीय संस्था (एनजीओ) (सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेव्यतिरिक्त इतर ) यांच्यामार्फत वर्गणी गोळा करणे तसेच त्याचा वापर करण्यासंदर्भात विधि व न्याय विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
वर्गणी, देणगी गोळा करण्यासाठी धर्मादाय आयुक्तालयाची लेखी परवानगी आवश्यक आहे; वर्गणी, देणग्या गोळा करतांना अनुक्रम असलेल्या छापील पावत्या देणे आवश्यक आहे, अशा खर्चाचे व्हाऊचर्स ठेवणे व गोळा करण्यात आलेली वर्गणी, देणगी पाच हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याचे सनदी लेखापालाकडून लेखा परीक्षण होणे आवश्यक आहे, अशा खर्चाची हिशोब पत्रके त्या त्या व्यक्ती, संस्थांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात जमा करणे असून गोळा करण्यात येणारी वर्गणी, देणगी रक्कम प्रथमत: ज्या हेतूसाठी गोळा करण्यात आलेली आहे त्याच हेतूसाठी वापरण्यात आली पाहिजे व त्यानंतर वर्गणी, देणगी शिल्लक राहत असेल तर धर्मादाय आयुक्त यांच्या परवानगीनेच इतर हेतूसाठी ती खर्च करता येईल;
या तरतुदीचे पालन करणे बंधनकारक असून पालन न करणरऱ्या व्यक्तीस सार्वजनिक विश्वस्त अधिनियम , 1950 मधील कलम 67 नुसार दहा हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
०००००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा