नंदुरबार दि. 7 : भारताची दक्षिण काशी म्हणून प्रकाशाचे धार्मिक व ऐतिहासिक महत्व आहे. त्याचबरोबर नाशिक व त्रबंकेश्वरच्या सिंहस्थ पर्वणी सोबतच प्रकाशा येथेही सिंहस्थ पर्वणीची परंपरा सुमारे साडेतीनशे शतकांपासून सुरु असून या महान परंपरेला प्रतिकात्मक ओळख देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रथमच बोधचिन्ह तयार करण्यात आले असून आजपासून प्रकाशाच्या सिंहस्थ पर्वणीला या बोधचिन्हाद्वारे प्रतिकात्मक ओळखच नाही तर रुपेरी किनार लाभली आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी तथा सिंहस्थ पर्वणी समन्वय समितीचे अध्यक्ष टि. एम. बागुल यांनी केले.
सिंहस्थ पर्वणी जिल्हा समन्वय समिती, सिंहस्थ
पर्वणी ध्वजारोहण सोहळा स्थायी समिती व जिल्हा
माहिती कार्यालय यांच्यावतीने आयोजित प्रकाशा येथील धर्मशाळेत प्रकाशा सिंहस्थ पर्वणीच्या
बोधचिन्ह लोकार्पण कार्यक्रमात श्री. बागुल बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सिंहस्थ पर्वणी
ध्वजारोहण सोहळा स्थायी समितीचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी
अधिकारी प्रमोद चौधरी, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उपविभागीय दंडाधिकारी नितीन
गावंडे, तहसिलदार नितीन गवळी, मोहन चौधरी, हरि पाटील विविध कार्यान्वयीन यंत्रणांचे
अधिकारी व पत्रकार यावेळी उपस्थित होते.
यावेळी श्री. बागुल म्हणाले, प्रकाशा हे गांव तापी व गोमाई व पुलिंदा नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. याठिकाणी पुरातन, ऐतिहासिक, निसर्गरम्य, भव्य व
कलात्मक मंदिरे असून ते एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे. याठिकाणी केदारेश्वर मंदिर, गौतमेश्वर मंदिर, संगमेश्वर
मंदिर, पुष्पदंतेश्वर मंदिर, माता मन्सापुरी मंदिर, गणपती मंदिर, सिंहस्थ ठिकाण गटी
परिसर व मिरवणुकीचे मुख्य ठिकाण तसेच तापी परिसर पर्यटनस्थळ असून त्यास दक्षिण काशी
असेही संबोधले जाते. दर 12 वर्षांनी कुंभमेळा
पर्वणी उत्सव भरतो. नाशिक व प्रकाशा येथील
दोन्ही उत्सव सारखे आहेत. यावेळी महाराष्ट्र,
गुजरात व मध्यप्रदेश या राज्यातून लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. हा उत्सव 12 महिने पर्वणी काळात सुरु राहतो. प्रकाशा
सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभुमीवर करावयाच्या आवश्यक ती कामे करण्यासाठी केवळ तीन
दिवसांचा कालावधी उरलेला आहे. आगामी काही
तासात पाऊस देखील पडण्याची शक्यता असून कामे पूर्ण करतांना अनेक समस्यांना तोंड देण्याची
वेळ येवू शकते. त्यादृष्टीने सर्व विभागांनी
त्यांचेमार्फत सुरु असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत ज्या कामांना निधी उपलब्ध नाही
परंतु भाविकांची गैरसोय तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सदर
कामे निकडीचे असल्याने संबंधित विभागांनी त्यांच्यामार्फत कामांसाठी तातडीने निधी मंजूर
करणेबाबत कार्यवाही करावी.
जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी प्रादेशिक पर्यटन विकास, जिल्हा वार्षिक योजना-
यात्रास्थळ विकास कार्यक्रम, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, खासदार स्थानिक विकास
कार्यक्रम याअंतर्गत एकूण 8 कोटी 67 लाख 4 हजार इतका निधी प्रकाशा सिंहस्थासाठी मंजूर
करण्यात आला असून त्यातील 7 कोटी 30 लाख 87 हजार इतका निधी शासनाकडून प्राप्त झाला
असून 7 कोटी 15 लाख 87 हजार इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
सिंहस्थाकरिता
विविध योजनांतून प्राप्त निधीचा गोषवारा
अ.क्र.
|
योजनेचे
नाव
|
वर्ष
|
प्रशासकीय
मंजुरी
|
शासनाकडुन
प्राप्त निधी
|
वितरीत
निधी
|
1
|
प्रादेशिक
पर्यटन विकास
|
2010-11
|
130.00
|
130.00
|
130.00
|
2012-13
|
65.00
|
65.00
|
65.00
|
||
2013-14
|
167.70
|
81.53
|
81.53
|
||
2014-15
|
90.61
|
40.61
|
40.61
|
||
एकुण
|
453.31
|
317.14
|
317.14
|
||
2
|
जिल्हा
वार्षिक योजना - यात्रास्थळ विकास कार्यक्रम (3604)
|
2013-14
|
160.00
|
160.00
|
160.00
|
2014-15
|
230.00
|
230
|
230
|
||
एकुण
|
390.00
|
390.00
|
390.00
|
||
3
|
आमदार
स्थानिक विकास कार्यक्रम
|
2010-11
|
10.00
|
10.00
|
10.00
|
2014-15
|
3.73
|
3.73
|
3.73
|
||
एकुण
|
13.73
|
13.73
|
13.73
|
||
4
|
खासदार स्थानिक विकास कार्यक्रम
|
2013-14
|
10.00
|
10.00
|
10.00
|
एकुण
|
10.00
|
10.00
|
10.00
|
||
एकुण
(1+2+3+4)
|
867.04
|
730.87
|
715.87
|
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा सिंहस्थ
पर्वणी ध्वजारोहण सोहळा स्थायी समितीचे अध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी प्रकाशा सिंहस्थ
पर्वणी सोहळ्याचे स्वरुप विषद करतांना 10 जुलै ते 14 जुलै, 2015 या कालावधीत होणाऱ्या
कार्यक्रमांची माहिती दिली, ती अशी…
दिनांक 10 जुलै, 2015 महाप्रसाद
Ø मानकरी श्री. बन्सीलाल जाधव पाटील
यांच्या गढीवरील निवासस्थासमोरील प्रांगणात
Ø महाभोजनाचा कार्यक्रम सकाळी
10.00 वाजेपासून सुरु होईल.
Ø महाभोजनासाठी सुमारे 25 हजार भाविक उपस्थित राहतील असा अंदाज.
दिनांक 13 जुलै, 2015 पेहरामणी मिरवणूक
Ø सकाळी 9.00 ते 11.00 वाजता पेहरामणी
मिरवणूक. (मानकरी यांची गढी ते गौतमेश्वर मंदीर पर्यंत)
Ø सकाळी 11.00 वाजता पेहरामणी विधी
संपन्न होईल.
Ø सकाळी 11.00 ते 12.30 वाजता पेहरामणी
मिरवणूक (गौतमेश्वर मंदीर ते मानकरी यांचे गढीपर्यंत त्याच मार्गाने परत येईल)
Ø सकाळी 12.30 ते दुपारी 1.00 वाजता
गढी येथे ध्वजस्थापना होईल.
Ø दुपारी 1.00 ते रात्री 8.00 वाजता
मानकरी दर्शन व ध्वजदर्शनासाठी रांगा लागतील. (गढीच्या दरवाज्यापासून खाली)
Ø रात्री 8.00 वाजता मुख्य ध्वज मिरवणूकीस
सुरुवात (मानकरी यांची गढी ते गौतमेश्वर मंदीर)
Ø मुख्य ध्वज मिरवणूक रात्रभर चालेल.
(अंदाजे 50,000) भाविक मिरवणूकीत असतील)
दिनांक 14 जुलै, 2015 सिंहस्थ पर्वणी ध्वजस्थान
Ø सकाळी 6.26 वाजता मिरवणूक गौतमेश्वर
येथे पोहचणार
Ø सकाळी 6.26 ते 10.15 वाजता पूजा
विधी
Ø सकाळी 10.15 वाजता ध्वज नदीत बुडविणार
त्याचवेळी भाविक स्नान करणार (यावेळी स्नानासाठी सुमारे 2 लाख भाविक उपस्थित राहतील)
Ø स्नानाचे ठिकाण-गौतमेश्वर मंदीर,
केदारेश्वर मंदीर व संगमेश्वर मंदीर.
Ø सकाळी 11.00 ते रात्री 11.00 वाजता
गौतमेश्वर मंदीर दर्शन.
बोधचिन्हाची संकल्पना
प्रकाशा सिंहस्थ पर्वणीचे बोधचिन्ह जिल्हाधिकारी
प्रदीप पी. यांच्या मार्गदरशनाखाली व जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांच्या
संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियानाचे बोधचिन्ह साकारणारे निर्मिती ग्राफिक्स मुंबईचे
अनंत खासबारदार व शिरीष खांडेकर यांनी साकारले असून या बोधचिन्हात प्रामुख्याने गौतमेश्वर
मंदीर, ध्वजपरिक्रमेचा ध्वज, केदारश्वर मंदीराजवळील भव्य दिव्य दिपमाळ व संस्कृतीचे
प्रतीक म्हणून शंख व उगवता सुर्य दाखविण्यात आला आहे.
|
आभार
प्रदर्शन सिंहस्थ पर्वणी ध्वजारोहन सोहळा स्थायी समितीचे कार्याध्यक्ष हरी पाटील यांनी
मानले.
0 0 0 0 0 0 0
0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा