धुळे, दि. 7 :- जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक शाळा,
अनुदानित/विना अनुदानित माध्यमिक शाळा, नगर पालिका, महानगर पालिका यांच्यामार्फत
सुरू असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी पर्यंत
शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सव
शिष्यवृत्ती योजने मार्फत शिष्यवृत्ती अदा करण्यात येते. या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या,
पालकांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यात वर्ग करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे बचत
खाते त्वरित उघडावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी
एस.बी. तोरणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
काही शाळेतील विद्यार्थ्यांचे बचत खाते सुरू
करण्यात आलेले नाही त्याऐवजी मुख्याध्यापकांचे (शाळेचे) खाते क्रमांक नमूद केले
जातात. ही बाबत अनुचित आहे. सन 2013-14 व सन 2014-15 या वर्षातील देयके विशेष बाब
म्हणून मंजूर करण्यात आलेली आहेत . ही
रक्कम संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे. तरी सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या तालुक्याचे
गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
सन
2015-16 या शैक्षणिक वर्षात सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्तीचे प्रस्ताव सादर करतांना
सर्व विद्यार्थ्यांचे (पालकांचे) खाते क्रमांक आवश्यक आहे. अपूर्ण प्रस्ताव, खाते क्रमांक नसलेले किंवा
मुख्याध्यापकांचे खाते क्रमांक नमूद केलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित
राहिल्यास किंवा शिष्यवृत्ती वेळेवर मिळाली नाही तर त्यास मुख्याध्यापक जबाबदार
असतील याची नोंद घ्यावी, परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा. जेणेकरून शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना
शिष्यवृत्तीची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करणे सुलभ होईल, असेही पत्रकात नमूद
केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा