धुळे,
दि. 24 :- येथील समर्थ कॅन्सर फाऊन्डेशन तर्फे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ
यांच्या हस्ते तंबाखू मुक्त शाळा आणि परिसर या उपक्रमांतर्गत भित्तीपत्रकाचे
विमोचन करण्यात आले. यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, बीआरजीएफ
योजनेचे समन्वयक अशोक पाटील, फाऊन्डेशनचे मुख्य विश्वस्त डॉ. तुषार पाटील
यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी
अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, उपचार करण्यापेक्षा उपाययोजना राबविणे महत्वाचे
असते. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने
शारिरीक हानी होऊ नये म्हणून
विद्यार्थ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर रहावे, असे यावेळी सांगितले.
डॉ. तुषार पाटील म्हणाले की, शहरातील
समर्थ कॅन्सर फाऊन्डेशन अनेक वर्षांपासून कॅन्सर मुक्ततेसाठी विशेष प्रयत्न करीत
आहे. शाळा, महाविद्यालयीन
विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही वर्षात तंबाखूजन्य पदार्थांचे आकर्षण वाढत आहे. त्यामुळे सहाजिकच कॅन्सरग्रस्त रूग्णांची
संख्या वाढत चालली आहे. त्यासाठी तंबाखूमुक्त शाळा आणि महाविद्यालय हा
उपक्रम घेऊन जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत.
या उपक्रमांतर्गत तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम दर्शविणारे भित्तीपत्रक तयार
करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा