धुळे, दि. 24 :- जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन
केंद्र, धुळे व रूबी कोटेक्स प्रायव्हेट लि., दिसान कोटेक्स प्रा. लि. दहिवद ता.
शिरपूर जि. धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. 29 जुलै, 2015 रोजी सकाळी 11-00 वाजता शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील रूबी कोटेक्स प्रायव्हेट लि. येथे इयत्ता दहावी, बारावी
उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांच्या रोजगार
सहाय्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या रोजगार मेळाव्याचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ
घ्यावा, असे आवाहन जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक
संचालक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले
आहे.
या
मेळाव्यासाठी रूबी कोटेक्स प्रायव्हेट लि. व दिसान कोटेक्स प्रा. लि. दहिवद येथील
उद्योजक मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची
जागेवरच निवड करणार आहेत. त्यासाठी रोजगार
व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी केलेल्या किमान एस.एस.सी., एच.एस.सी.
उत्तीर्ण व 18 ते 35 वर्षे या वयोमर्यादेतील ज्या उमेदवारांची खाजगी क्षेत्रातील
उद्योजकांकडे काम करण्याची तयारी आहे, त्यांनी उपस्थित रहावे. सोबत येतांना शैक्षणिक प्रमाणपत्र, बायोडाटा यासह स्व:खर्चाने उपस्थित रहावे,
असेही पत्रकात नमूद केले आहे.
000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा