धुळे, दि. 20 :-
रस्ते अपघात प्रसंगी किंवा रस्त्याजवळून जाणारा पादचारी अथवा एखादा दक्ष नागरिक
अपघातग्रस्त नागरिकांच्या बचावास स्वत:हून पुढे येणारा व अपघातग्रस्तांचा जीव
वाचावा अशा प्रामाणिक उद्देशाने मदत करणाऱ्या नागरिकास अपघाताचे तपासासंबंधी तपास
यंत्रणेकडून व वैद्यकीय उपचारासंबंधी मदत व्हावी म्हणून संबंधित यंत्रणांकडून अशा
नागरिकास नाहक त्रास होऊ नये म्हणून भारत सरकारच्या 12 मे, 2015 रोजीच्या अधिसूचनेत मार्गदर्शक
तत्वे प्रसिध्द करण्यात आलेली आहेत.
रिट
पिटीशन क्र. 235/2012 सेव्ह लाईफ फाऊन्डेशनवर इतर विरूध्द भारत सरकार व इतर या
न्यायालयीन प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने
29 ऑक्टोबर, 2014 रोजी दिलेल्या निर्देशानुसार केंद्र शासनाने सडक परिवहन व
राजमार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातामध्ये घटनास्थळी अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या
कर्तव्यदक्ष नागरिकांना अपघातातील वैद्यकीय उपचार तात्काळ मिळावे म्हणून तसेच तपास
प्रक्रिये दरम्यान संबंधित यंत्रणाकडून नाहक त्रास होऊ नये म्हणून भारत सरकारने
सदर अधिसूचना जारी केलेली आहे.
00000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा