गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करण्याची गरज -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


 धुळे, दि. 20 :- जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
आज स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सद्भावना दिवसानिमित्त प्रतिज्ञा देतांना जिल्हाधिकारी श्री. मिसाळ बोलत होते.  यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे,  जिल्हा पुरवठा अधिकारी बी. एन. सैंदाणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जे. आर. वळवी, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, श्रीमती शुभांगी भारदे, श्रीमती हेमांगी पाटील,  अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. 
प्रतिज्ञा देतांना पुढे जिल्हाधिकारी श्री. मिसाळ म्हणाले, आमच्या मधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरूपाचे सर्व  प्रकारचे मतभेद आपण हिंसाचाराचा व सांविधानिक मार्गाने सोडविण्याचा  प्रत्येकाने संकल्प करावा, असेही यावेळी जिल्हाधिकारी श्री. मिसाळ म्हणाले.
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केले.
दृष्टीक्षेपात सद्भावना दिवस.
·        जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली  सर्वांना सद्भावनेची प्रतिज्ञा.
·        प्रशासकीय इमारतीत अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आली प्रतिज्ञा.
·        मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी उपस्थित.
·        निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी केले प्रास्ताविक.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा