धुळे, दि. 20 :-
सिंहस्थ कुंभमेळा कालावधीत शाहीस्नानाच्या दिवशी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे
मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने वाहतूक रहदारीचे नियमन करण्यासाठी
आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकरीता वाहतूक
वळविण्याचे मार्ग निश्चित करण्यात आले आहे.
राज्याचे
विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33
(1) (ब) (क) तसेच मोटार वाहन कायदा कलम 1988 च्या कलम 115 अन्वये यासंबंधीची
अधिसूचना जारी केली आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर शहरात मालवाहतूक वाहने 27 ऑगस्टच्या
मध्यरात्रीपासून 30 ऑगस्ट मध्यरात्रीपर्यंत, 11 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 14
सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत, 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 19 सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत
आणि 24 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून 25 सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत वळविण्यात
येतील. हे आदेश दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस
सिलेंडर, लिक्वीड मेडीकल ऑक्सीजन, भाजीपाला आदी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या
वाहनांना लागू असणार नाही.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा