धुळे जिल्हयात 27 नोव्हेंबर, ते 7 डिसेंबर, 2011 या
कालावधीत मुस्लीम बांधवांचा मोहरम सण साजरा होणार आहे. धुळे जिल्हा हा
जातीयदृष्टया संवेदनशिल जिल्हा असल्याने या काळात एखाद्या क्षुल्लक कारणावरुन
देखील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने धुळे जिल्हयातील कायदा व
सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने
जिल्हादंडाधिकारी प्रकाश महाजन यांनी दिनांक 23 नोव्हेंबर,
2011 ते 7 डिसेंबर, 2011 पर्यंत संपुर्ण धुळे जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम कलम 37
(1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा