राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील 9 ते 14
वयोगटातील विशेष शाळेतील बाल कामगारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना प्राथमिक
व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी संबंधितांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याच्या सूचना
जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी
कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाच्या कार्यकारी मंडळाची सभा
राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या
अध्यक्षतेखाली आज झाली. यावेळी अप्पर
जिल्हाधिकारी डॉ. अशोक करंजकर, सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी एम.टी.
पाटील, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक आखाडे, वरिष्ठ समाजकल्याण निरीक्षक विलास करडक, नायब
तहसिलदार सुचेता चव्हाण, स्वयंसेवी संस्थेचे प्रमुख उपस्थित होते.
खाजगी उद्योग, व्यवसायातील बाल कामगारांच्या तपासणीसाठी
परिणामकारक अचानक धाडसत्र राबविण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी प्रकाश महाजन म्हणाले की,
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण देणे आवश्यक असून विशेष शाळेत दाखल केलेल्या
विद्यार्थ्यांत बोगस विद्यार्थी असल्यास त्यांचेविरुध्द गुन्हे दाखल करण्यात
येतील.
जिल्हाधिकारी
प्रकाश महाजन म्हणाले की, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पातील रिक्त असलेल्या
मानधनावरील प्रकल्प संचालक तसेच दोन डॉक्टरांची पदे त्वरीत भरण्यासाठी सरकारी
कामगार अधिका-यांनी कार्यवाही करावी. तसेच
पोषण आहार तसेच विद्यावेतन मुलांना वेळेवर मिळण्यासाठी योग्य ते नियोजन करावे.
सरकारी
कामगार अधिकारी एम.टी.पाटील यांनी राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाअंतर्गत जिल्हयात
मंजूर 40 पैकी 33 विशेष शाळेत 356 विद्यार्थी मुख्य प्रवाहात दाखल केल्याबाबतची
माहिती दिली. तसेच विशेष शाळेतील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी
डॉक्टरांच्या नियुक्ती, विद्यावेतन न भरणा-या संस्था चालकांवर कार्यवाही आदिंची
तपशिलवार माहिती यावेळी दिली.
यावेळी
स्वयंसेवी संस्थाचालकांनी विविध अडचणी मांडल्या. यावेळी शिरपूर तालुक्यातील अर्थे
येथील चिराई देवी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे मनोहर पाटील, कापडणे इंदिरा महिला
व बालकल्याण संस्थेचे चंद्रकांत पाटील, कापडणे जोगाई माता सांस्कृतिक मंडळाचे
शिवाजी पाटील, गायत्री एज्यु. ट्रस्टचे विजय वाघ, साक्री तालुक्यातील डांगशिरवाडे
येथील जय बजरंग बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे धर्मराज सोनवणे, अमोल शैक्षणिक व
सामाजिक संस्थेच्या सौ.अनिता रघुवंशी, साक्री येथील नालंदा बालविकास मागासवर्गीय
महिला विकास मंडळाचे शरद मोरे, मास्टर ट्रेनर व्ही.ए. देशमुख, फिल्ड ऑफिसर डी. यु.
बडगुजर सौ. निता काळोखे, लिपीक भास्कर बोरसे श्रीमती जयश्री निकम आदि उपस्थित
होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा