मंगळवार, १३ मार्च, २०१२

यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि. 12 : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उप पंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषदेचे उप सभापती वसंत डावखरे, विधानपरिषदेचे सदस्य सुभाष चव्हाण, विधानसभेचे सदस्य मधु चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
          याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, सह सचिव भाऊसाहेब कांबळे, यु. के. चव्हाण, विशेष कार्य अधिकारी श्रीनिवास जाधव, वित्तीय सल्लागार सु. सा. गायकवाड, वि. स. पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नागेश केसरी, उप सचिव अशोक मोहिते, सुभाषचंद्र मयेकर, अवर सचिव शिवदर्शन साठ्ये, जितेंद्र भोळे,  ना. रा. थिटे, मुख्य सुरक्षा अधिकारी शिवाजी बोडखे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
          स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आजपासून शुभारंभ होत असून त्यानिमित्त त्यांच्या पुतळ्यास आकर्षक पुष्पसजावट करण्यात आली आहे.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा