मुंबई, दि.12 : महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख
यांच्या अध्यक्षतेखाली नियोजित महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य जिमखान्याचे व्यवस्थापन,
पर्यवेक्षन, चालन व देखभाल करण्याकरिता महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य जिमखाना
व्यवस्थापकीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीचे विधानसभाध्यक्ष दिलीप
वळसे-पाटील हे सहअध्यक्ष आहेत.
या समितीच्या सदस्यपदी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,
उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापदी वसंत डावखरे आणि
विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, विधानपरिषदचे
विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे, संसदीय
कार्य राज्यमंत्री भास्कर जाधव, राजेंद्र मुळक आहेत.
राज्य विधानमंडळाच्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांमधून
अध्यक्षपदस्त व्यक्तिने नामनिर्देशित केलेला प्रत्येकी एक सदस्य यामध्ये आमदार
सर्वश्री सुभाष देसाई, बाळा नांदगावकर, प्रकाश महेता, अरुण गुजराथी, उल्हास पवार,
दिवाकर रावते, विजय सावंत यांचा समावेश आहे.
अरुण गुजराथी यांची समितीचे कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात
आली असून पदशिद्ध कार्यकारी सचिव म्हणून विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव हे आहेत.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा