मुंबई,दि.5 : कोकणच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेला
राष्ट्रीय महामार्ग क्र.17 च्या संदर्भात असलेल्या अडीअडचणी तथा महत्त्वाच्या
मंजूरी तातडीने मार्गी लावाव्यात. असे निर्देश जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांनी
आज संबंधितांना दिले.
आज श्री.तटकरे यांच्या दालनात संबंधित
विभागाचे अधिकारी यांच्या समवेत उच्च स्तरीय बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मध्य रेल्वेचे उपमुख्य पूल अभियंता
श्री. कटके,विभागीय अभियंता ए. के. पाडेंय, भारतीय राष्ट्रीय
महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस.के. सूरवसे, आर.सी.एफचे महाव्यवस्थापक
(एचआर) श्री.नावडे आदि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत श्री.तटकरे यांनी खारपाडा, पेण,
वडखळ येथील नियोजित रेल्वे उड्डाणपूला संदर्भात चर्चा करुन या बाबत रेल्वे
विभागाने तातडीने मंजूरीसाठी कार्यवाही करावी असे निर्देश दिले. या महामार्गावरील
वाहतुकीची कोडीं आणि इतर समस्या त्यामुळे दूर होतील असा विश्वास मंत्रिमहोदयांनी
त्यावेळी व्यक्त केला. तसेच या संदर्भात
जिल्हाधिकारी रायगड यांनी संबंधितांसोबत बैठक घेऊन पाठपुरावा करावा
असेही त्यांनी सांगितले.
----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा