धुळे, दि. 3 :- मुस्लीम बांधवाचा पवित्र रमजान महिना सुरु
असून दि.18 जुलै,15 रोजी रमजान ईद सण साजरा करण्यात येणार आहे.तसेच दि.14
जुलै,2015 रोजी मुस्लीम बांधवातर्फे शब-ए-कद्र हा सण साजरा होणार आहे. या सणा
निमित्त मुस्लीम बांधव मोठया प्रमाणात संपुर्ण रात्रभर मस्जीद,दर्गा,कब्रस्थान या
ठिकाणी नमाजपठण करतात. रात्रभर जागे राहतात. तसेच धुळे जिल्हयात एकूण 223 ग्रामपंचायतीचा
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून दि.01 जुलै,2015 पासून आचारसंहिता लागू करण्यात
आली आहे.
तसेच दि.13 जुलै,15 ते दि.21 जुलै,2015 रोजीपर्यत
नामनिर्देशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया होणार असून आगामी सण उत्सव व ग्रामपंचायत
निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मदत व्हावी म्हणून दि.13
जुलै,2015 चे 00.01 वाजेपासून ते दि.27 जुलै,2015 चे 24-00 वाजेपावेतो संपुर्ण
धुळे जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये प्रभारी
जिल्हादंडाधिकारी ओमप्रकाश देशमुख प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा