धुळे, दि. 14:- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना देशभरात
राबविण्यासाठी दि.15 जुलै,2015 रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधुन
कौशल्य विकास व उद्योजकता 2015 हे नवे राष्ट्रीय धोरण जाहीर करण्याचे निश्चित
करण्यात आले आहे.
त्यानिमित्त कौशल्य विकास कार्यालयाचे
महत्व,धोरण व प्रत्यक्ष अनुभव जिल्हास्तरीय कौशल्य विकास कार्यकारी समितीच्या सर्व
सदस्यांना या योजनेची माहिती व्हावी. या करिता दि.15 जुलै,2015 रोजी जिल्हाधिकारी
याच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे दुपारी 3-00
ते 6-00 वाजता जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठकीचे आयोजन करण्यात आले
आहे.
तसेच बैठकीच्या ठिकाणी औद्योगिक
प्रशिक्षण संस्था व एम.इ.एस अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या 5 उमेदवारांना रोजगार
देणा-या उद्योजकांकडून नियुक्तीपत्रे वाटपाचा तसेच उद्योजक व कौशल्य प्रशिक्षण
देणा-या संस्था यांचा सत्कार कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात
येणार आहे.
या बैठकीस जिल्हयातील नामांकित
उद्योजक,शिक्षण व प्रशिक्षण देणारे संस्था प्रमुख, कौशल्य विकासामध्ये कार्यरत
असणा-या स्वंयसेवी संस्था व खाजगी संस्था तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ यांनी या
बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमती अनिसा एल तडवी,सहायक संचालक,कौशल्य
विकास,रोजगार व उद्योजक विभाग यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा