मुंबई, दिनांक 29 : महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ मधील कलम १ मध्ये मराठी भाषेचा 'राजभाषा' असा सुस्पष्ट उल्लेख नसल्यामुळे या अधिनियमात सुधारणा करणारे महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम २०१५ हे विधेयक आज विधानसभेत मांडण्यात आले आणि हे विधेयक विधानसभेत एकमताने संमत करण्यात आले. मराठी भाषा मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज हे विधेयक मांडले.
कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आदी राज्यांच्या राजभाषा नियमांमध्ये त्या त्या राज्यांच्या राजभाषांचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. मात्र तसा स्पष्ट उल्लेख महाराष्ट्र राजभाषा अधिनियमामध्ये आजपर्यंत केलेला नव्हता. त्यामुळे या विधेयकात सुधारणा करुन महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असेल असा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याचे मराठी भाषा मंत्री श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.
००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा