मुंबई, दि. 12 :
क्रीडा व युवक संचालनालयाच्या आस्थापनेवर मानधनतत्वावर भरण्यात येणाऱ्या 153
क्रीडा मार्गदर्शक पदांच्या मुलाखती निवडणूक आचारसहिंतेमुळे पुढे ढकलल्या असून
त्या 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2012 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.
या संदर्भात डिसेंबर 2010 मधील जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या
अर्जामधील पात्र 151 उमेदवारांसाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
येथे दिनांक 16 जानेवारी ते 20 जानेवारी 2012 या काळात निवड समिती मार्फत मुलाखतीचे
आयोजन करण्यात आले होते व त्याबाबतचे पत्र त्यांना 3 जानेवारी 2012 रोजी
पाठविण्यात आले होते. परंतु राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमामुळे राज्य निवडणूक
आयोगामार्फत आचारसहिंता लागू करण्यात आली आहे. या आदेशानुसार आचारसहिंता कालावधीत
मुलाखती घेण्यास निर्बंध असल्याने सदर मुलाखतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असून
मुलाखतीचा पुढील कार्यक्रम दिनांक 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2012, या
कालावधी मध्ये निश्चित करण्यात आला आहे व याबाबतची माहिती वैयक्तिकरित्या प्रत्येक
उमेदवारास पाठविण्यात आली असल्याचे क्रीडा व युवक सेवा आयुक्त यांनी कळविले आहे.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा