मुंबई, दि. 12 : राज्यपाल के. शंकरनारायणन्
यांच्यावर मेंदूला शुद्ध रक्त पुरवठा करणाऱ्या डाव्या रक्त वाहीणीतील अडथळे दूर
करण्यासाठी काल बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या
प्रकृतीत आता सुधारणा होत असून राज्यपालांना अतिदक्षता कक्षातून त्यांच्या खोलीत
नेण्यात आले आहे.
बॉम्बे हॉस्पिटलचे मानद अधिष्ठाता आणि
प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. बी. के. गोयल त्यांच्यावर उपचार करीत असून
राज्यपालांना 2/3 दिवसांत घरी सोडले जाईल.
राज्यपालांना मंगळवार दि. 10 जानेवारी
पासून भोवळ आल्यासारखे होत होते. नियमित तपासणी नंतर त्यांच्या मेंदूला शुद्ध
रक्ताचा पुरवठा करणाऱ्या डाव्या रक्त वाहीणीत अडथळा असल्याचे आढळून आले होते. हा
अडथळा शस्त्रक्रियेने दूर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गोव्याचे
मुख्यमंत्री दिगंबर कामत, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, आमदार कृपाशंकर
सिंह यांनी काल रुग्णालयात जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची
चौकशी केली.
केंद्रीय संरक्षण मंत्री ए. के. ॲन्थोनी
यांनी डॉ. बी. के. गोयल यांना दूरध्वनीकरुन राज्यपालांच्या प्रकृतीची चौकशी केली
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा