शुक्रवार, ३० मार्च, २०१२

शौर्यपदक धारकांच्या विधवा/अवलंबितांना मे 2011 पासून सुधारित अनुदान


मुंबई, दि. 27 : महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या शौर्यपदक धारकांच्या विधवांना/अवलंबितांना पदकनिहाय तसेच दुसऱ्या महायुध्दात भाग घेतलेल्या माजी सैनिक/विधवांना 1 मे 2011 पासून दरमहा सुधारित अनुदान देण्यात येत आहे.
 हे अनुदान जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयांना वितरीत करण्यात आलेले आहे. तरी संबंधित लाभार्थ्यांनी त्यांच्या जिल्ह्याच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा