मुंबई, दि. 27 : प्रधान मुद्रांक कार्यालय, मुंबई व उच्च न्यायालय, मुंबई येथील पदसिध्द मुद्रांक विक्रेत्यांमार्फत विक्री करण्यात येणाऱ्या मुद्रांकांची नियमानुसार 31 मार्च 2012 रोजी सहामाही पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रधान मुद्रांक कार्यालयातून विकल्या जाणाऱ्या मुद्रांकांची विक्री 31 मार्च 2012 रोजी जनतेसाठी संपूर्ण दिवस बंद राहणार आहे. तथापी मुंबई विभागातील परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांकडील मुद्रांक विक्री सुरु राहणार आहे, असे अप्पर मुद्रांक नियंत्रक, मुंबई यांनी कळविले आहे.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा