मुंबई, दि. 3 : नाशिक येथे 7 ते 16 एप्रिल 2012 दरम्यान सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये
नाशिक आणि ठाणे पात्र उमेदवारांना या मेळाव्यात प्रवेश दिला जाणार आहे.
हा मेळावा सर्व पात्र उमेदवारांसाठी खुला असून इच्छुक
उमेदवारांनी थेट लाईट रेजिमेंन्ट,
देवळाली कॅम्प, नाशिक येथे दिलेल्या वेळा पत्रकाप्रमाणे हजर रहावे. यामध्ये मुंबई
व नवी मुंबई मधील सोल्जर ट्रेडसम्न सोडून सर्व उमेदवारांना 10 एप्रिल 2012 रोजी तर नाशिक, रायगड, ठाणे या ठिकाणच्या सर्व पात्र
उमेदवाराना 11 एप्रिल रोजी सहभागी होता येईल. फक्त सोल्जर ट्रेडसम्न उमेदवारांची
13 एप्रिल 2012 रोजीच्या मेळाव्यात सैन्य भरती केली जाणार आहे. या मेळाव्याच्या
ठिकाणी 15 व 16 एप्रिल 2012 रोजी सर्व उमेदवारांची शारीरिक चाचणी केली जाणार आहे. यामध्ये माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण, वय 17 वर्ष 6 महिने ते 21 वर्षे या
वयोगटातील उमेदवार पात्र असून त्याकरिता 168 सें.मी उंची, 50 किलो वजन, छाती 77/82
सें.मी अशी शारिरीक पात्रता आवश्यक आहे.
या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे: सैनिक जीडी
पदासाठी 45 टक्के मार्कासह शालांन्त परीक्षा उत्तीर्ण तर तंत्र सैनिक आणि नर्सिंग
सहाय्यक पदासाठी 12 वी विज्ञान परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवाराने आपल्या सोबत दहावी, बारावीच्या निकालाची सत्य
प्रत, चारित्र्य पडताळणीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जिल्हा
दंडाधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र,
त्यासोबतच 5x4 आकाराचे
अलिकडच्या काळातील 15 फोटो, भाषिक उमेदवारांना वास्तव्याचा दाखला ही प्रमाणपत्रे
आवश्यक आहेत असे मुंबई शहर सैनिक कल्याण कार्यालयाने कळविले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा