मुंबई, दि. 3 : ब्रिजस्टोन वर्ल्ड सिरीज हॉकी चॅंम्पियन्स स्पर्धेतील विजेत्या शेर-ए-पंजाब संघाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते चषकाचे वितरण करण्यात आले.
महिंद्रा स्टेडियम येथे काल सायंकाळी शेर-ए-पंजाब व पुणे स्ट्रायकर्स यांच्या दरम्यान हॉकी सामना झाला. यात शेर-ए-पंजाब संघ विजेता ठरला. संघाचा कप्तान प्रबज्योत सिंग याने मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. यावेळी केद्रीय क्रिडा मंत्री अजय माकन, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण, अभिनेता सुनिल शेट्टी, बालकृष्णन, आर. के. शेट्टी, हरिष तिवानी, प्रशांत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्री. माकन यांच्या हस्ते खेळाडूंचा गोरव करण्यात आला.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा