धुळे, दि. 10 :- नाशिक येथे युध्द विधवा,
माजी सैनिकांच्या विधवा पत्नी, माजी सैनिक व सेवारत सैनिकांच्या मुलां-मुलींसाठी सैनिकी मुलींचे वसतिगृह, नाशिक दूरध्वनी क्र.
0253-2315065 आणि सैनिकी मुलांचे वसतिगृह, नाशिक दूरध्वनी क्र. 0253-2315246
सर्वसोयींनी युक्त अशी वसतिगृहे, पत्रकार कॉलनी, शासकीय दूध डेअरी जवळ, त्र्यंबक
रोड, नाशिक या ठिकाणी कार्यरत आहे. प्रवेश
अर्ज व अधिक माहितीसाठी वसतिगृह अधीक्षक, अधीक्षिका यांचेकडे दूरध्वनीवरून अथवा
समक्ष संपर्क साधून वसतिगृह प्रवेश पुस्तिका प्राप्त करून घ्याव्यात. या संधीचा जास्ती-जास्त माजी सैनिक पाल्यांनी
तसेच इतरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे/नंदुरबार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर (निवृत्त)
सोपान डोके यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
या
वसतिगृहांमध्ये इयत्ता 10 वी ते पदव्युत्तर शिक्षण तसेच औद्योगिक प्रशिक्षण आणि
तांत्रिक विद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या युध्दविधवा पाल्य, माजी सैनिक विधवा
पाल्य, माजी सैनिक व युध्दात जखमी झालेल्या माजी सैनिकांचे पाल्य व सेवारत सैनिक
पाल्य व त्यांची पत्नी यांना प्रवेश देण्यात येईल.
दरमहा
आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. त्यात सेवारत सैनिकाच्या भोजन, निवास व सेवा
करासह अधिकारी-1 हजार रूपये, जेसीओ-900 रूपये, शिपाई/एनसीओ-700 रूपये, माजी
सैनिकाच्या भोजन, निवास व सेवा करासह- अधिकारी व ऑन कमिशन्ड अधिकारी-900 रूपये,
जेसीओ-800 रूपये, शिपाई/एनसीओ साठी 600 रूपये तसेच इतर नागरिकाच्या भोजन, निवास व
सेवा करासह पूर्ण दर 1,800 रूपये राहील.
युध्दविधवा व इतर माजी सैनिक विधवांच्या सर्व पाल्यांना तसेच अनाथ
पाल्यांना भोजन, निवास व सेवा शुल्क मोफत आहे.
सैनिकांचे पाल्य भरून झाल्यावर जागा रिक्त असल्यास इतर नागरिकांच्या
पाल्यांचा, तिसऱ्या, अंतिम फेरीत विचार करण्यात येईल, असेही पत्रकात नमूद केले
आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा