मुंबई, दि. ९ अनुसूचित जाती, जमाती, अपंग, मानसिक
दुर्बल व कुष्ठरोगीसेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक
कार्यकर्त्यांचा व स्वयंसेवी संस्थांच्या
कामाचा गौरव करण्यासाठी सामाजिक
न्याय विभागामार्फत दिल्या
जाणाऱ्या पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत
रविदास पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ
साठे,शाहू-फुले-आंबेडकर
पारितोषिक या पुरस्कारांसाठी पात्र व इच्छूक व्यक्ती तसेच संस्थांनी दि.१५ जुलै
२०१५ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, मुंबई शहर यांनी केले आहे.
वैयक्तिक
पुरस्कारासाठी पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (व्दिप्रतीत) केलेल्या कार्यबद्दल वर्तमानपत्रांतील कात्रणे, प्रशस्ती
पत्रके, पोलीस
दाखला या माहितीसह ५० वर्षांवरील पुरूष व
४० वर्षांवरील महिला (फक्त मुंबई शहर जिल्ह्यात वास्तव्य असलेल्या) स्थानिक कार्यकर्त्यांनी व सेवाभावी संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज सहाय्यक
आयुक्त, समाज
कल्याण, मुंबई
शहर यांचे कार्यालय,
प्रशासकीय इमारत, भाग १, चौथा मजला, आर. सी.
मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००७१
येथून उपलब्ध करून घेऊन १५ जुलै २०१५ पर्यंत दोन प्रतींत परिपूर्ण प्रस्ताव समक्ष
सादर करावेत असेही कळविले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा