धुळे, दि. 10 :- येथील बसस्थानकाच्या
बाजूला सैनिकी मुलांचे वसतिगृह असून या
वसतिगृहात आजी-माजी सैनिकांच्या इयत्ता 8 वी पासून पुढील अभ्यासक्रमांचे शिक्षण
घेत असलेल्या विद्यार्थ्यांना माफक शुल्क आकारून प्रवेश दिला जातो. धुळे जिल्ह्यातील माजी सैनिक व दिवसंगत सैनिक,
माजी सैनिक यांच्या पत्नींनी शैक्षणिक वर्ष 2015-16 मध्ये इयत्ता 8 वी वा पुढील
शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी या सैनिकी मुलांच्या वसतिगृहाच्या सेवेचा लाभ घ्यावा,
धुळे/नंदुरबार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कमांडर (निवृत्त) सोपान डोके
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
या वसतिगृहात
राहण्याची, भोजनाची व चोवीस तास पाण्याची उत्तम व्यवस्था आहे. वसतिगृहात कार्यरत असलेले कर्मचारी मुख्यत्वे
करून सैन्य सेवेतून सेवानिवृत्त झालेले सैन्य अधिकारी व कर्मचारी असल्याने
त्यांच्याकडून वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तम शिस्त व मार्गदर्शन केले
जाते.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा